पुणे : साखर उद्योगात माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी अनेक वर्षे काम केले आहे. साखर धंद्याबाबतच्या इतिहासाची संपूर्ण एकत्रित माहिती असलेला ग्रंथ त्यांनी तयार केला असून, तो मी चाळलेला आहे. साखर उद्योगातील सहकारी, अभ्यासकांना हे पुस्तक मार्गदर्शक व फायदेशीर ठरणार असल्याचे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे (व्हीएसआय) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
मांजरी येथील ‘व्हीएसआय’मध्ये शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी राज्याचे माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल साखर उद्योगाची भरारी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. , त्या वेळी ते बोलत होते. पवार यांच्यासह सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विजयसिंह मोहित पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.