शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अंतराळ संशोधन केंद्राने या खगोलीय नजाराचे खुले निरीक्षण सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी रात्री ८ नंतर आयोजित केले आहे.
डॉ. राजीव व्हटकर
कोल्हापूर – या वर्षातील सर्वात मोठ्या उल्कावर्षांपैकी एक असलेल्या जेमिनिड्स उल्कावर्षाव येत्या शुक्रवार (१३ डिसेंबर) रात्री मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. या वर्षी चंद्रप्रकाशामुळे उल्कावर्षाव दिसण्यात थोडासा प्रभाव पडत असला तरीही प्रति तास सुमारे 120 उल्का दिसण्याची शक्यता आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अंतराळ संशोधन केंद्राने या खगोलीय नजाराचे खुले निरीक्षण सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी रात्री ८ नंतर आयोजित केले आहे. पन्हाळा हे निरीक्षणासाठी आदर्श ठिकाण आहे कारण येथे प्रकाश प्रदूषण कमी आहे आणि आकाश स्पष्ट दिसते. तरी सर्व नागरिक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन या केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी केले आहे.
उल्कावर्षाचे निरीक्षण कसे करावे ?
शहराच्या प्रकाशापासून दूर, अंधारात जा.
आरामदायक आसन घ्या आणि डोळ्यांना अंधारात सवय होऊ द्या.
डोळे आकाशाकडे करा.
उल्का दिसण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क- डॉ. राजीव व्हटकर- ७५८८२४६१७०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.