आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे दिंडा…
प्रशांत सातपुते,
माहिती जनसंपर्क अधिकारी, 94034 64101
दिंडा या वनस्पतीला ढोलसमुद्रीका असे स्थानिक नाव आहे.
शास्त्रीय नाव – Leea macrophylla
कुळ – Leeaceae
स्थानिक नाव – ढोलसमुद्रिका
उपयुक्त भाग – पाने
ही प्रजाती पश्चिम घाट, कोकण, मराठवाडा, विदर्भातील जंगलात आढळते. औषधामध्ये दिंडाचे मूळ वापरले जाते. वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत. कंदाचा लेप नायट्यावरही उपयुक्त आहे.
दिंड्याची भाजी
साहित्य – एक जुडी दिंडे, अर्धा वाटी मोड आलेले वाल, एक कांदा, सहा सलून पाकळ्या, थोडासा गुळ, आमसुल/कोकम, दोन चमचे खिसलेले आले खोबरे, कोथिंबीर, फोडणीला मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, तेल.
कृती
दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगाप्रमाणे दिसेपर्यंत सोला. नंतर चिरुन धुऊन घ्या, तेल एका कढईत गरम करुन मोहरी, जिरे व हिंग टाका. नंतर त्यात कांदा, लसुन टाका. गुलाबी झाल्यावर त्यात गरम मसाला व चिरलेली भाजी टाका. झाकण टाकून मंद आचेवर ठेवा. भाजी शिजल्यावर त्यात गुळ, कोकम, कोथिंबीर व ओले खोबरे, मीठ टाका.
औषधी गुणधर्म –
व्रणरोपक म्हणुन दिंडा ही वनस्पती प्रसिध्द आहे.
औषधात दिंड्याचे मुळ वापरतात.
वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.