कोणी केव्हाही
जाऊ शकतो
कोणाही
बरोबर
जाता येता
रोज, आपली
किंमत वाढवून
घेऊ शकतो
आदेश तुमचा
कोणाच्याही आदेशाने
सोयीनुसार कोणालाही
विकू शकतो
पुनः निघू शकतो
एकत्रही
बघायला
डोंगर, झाडी
करणार काय आहोत
अशांचे पुढे, परत तर
बोलावण्याचा
अधिकारच नाही
काय ते
एकदा
नीट
ठरवा
ते तर करणार तेच,
नुरा कुस्तीत इथल्या
कोणालाही
हरवा, जिंकवा
शोधू त्यांना नका,
शोधा काय हवे
ते आपल्यालाच
आपले
बरेच दिवस
झाले आहेत, सारे
सारेच घालवून
बसले
नुसते पागलखाने भोवती,
त्यात आपणही
करून घ्यायची का
आपली भरती?
हेच चालणार आहे, हेच घेणार आहोत चालवून
की सोडणार आहोत पुनः सारे हलवून ?
- श्रीपाद भालचंद्र जोशी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.