June 25, 2025
Still from Do Kap Chai short film showing a teacup with warm light, symbolizing memory, emotion, and AI storytelling
Home » ‘दो कप चाय’ मध्ये एआय आणि कथाकथन यांचा सुंदर संगम
मनोरंजन

‘दो कप चाय’ मध्ये एआय आणि कथाकथन यांचा सुंदर संगम

“दो कप चाय” — भावना, आठवणी आणि एआयच्या सहाय्याने तयार झालेला एक हृदयस्पर्शी लघुपट …एक कप त्याच्यासाठी… आणि एक कप त्या कुणासाठी ? ही केवळ एक कथा नाही. ती एक प्रक्रिया आहे. अर्निमा या बंगळुरुस्थित स्टुडिओमधील सर्व महिला टीमचा हा प्रयत्न आहे. जी अ‍ॅनिमेशन, AR, आणि AI आधारित व्हिडिओ कंटेंट तयार करते.

बंगळूरू स्थित अर्निमा या स्टुडिओच्या तीन सह-संस्थापक सदस्य मनीषा रोडे, दीपा गोक्काकर, आणि सोनाली देशपांडे यांनी हा लघुपट तयार केला आहे. या तिघी मिळून संकल्पना मांडणे, स्क्रिप्ट लेखन, व्हिज्युअल डिझाईन, आणि तंत्रज्ञानाचा वापर या सगळ्या गोष्टीवर एकत्र करत काम करतात. ‘दो कप चाय’ या प्रकल्पातून त्यांनी दाखवून दिलं की योग्य कल्पना, मेहनत आणि योग्य टूल्स वापरून प्रभावी स्टोरीटेलिंग घडवता येते.

‘दो कप चाय’ हा लघुपट सध्या प्रेक्षकांच्या मनाला चटका लावतो. पण त्यामागे आहे एक खोल कथा आहे. ही केवळ एका वृद्धाच्या दररोजच्या सवयीची गोष्ट नाही, तर काळजात एक खोलवर रुजलेली आठवण, न सांगितलेली प्रतिक्षा आणि गहिवरलेली भावना आहे. पण या भावनांच्या कथेला एक वेगळी उंची देणारी गोष्ट म्हणजे ही संपूर्ण शॉर्ट फिल्म एआय (AI) च्या सहाय्याने तयार करण्यात आली आहे.

कथे मागचं कारण – ‘दो कप चाय’?

या लघुपटाची कल्पना एकदम साधी होती. एक वृद्ध माणूस जो दररोज एका चहाच्या टपरीवर येतो, दोन कप चहा मागवतो आणि वाट पाहत राहतो. संवाद काहीच नाहीत. पण चेहऱ्यावरच्या रेषा, डोळ्यातली प्रतीक्षा, आणि एका रिकाम्या कपामागची भावना हे सर्व काही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.

ही कथा प्रत्येक भारतीयाला आपली वाटावी अशी आहे. कारण आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एखादा ‘रिकामा कप’ असतो, जो आपल्याला कुणाच्या तरी आठवणीशी जोडून ठेवतो.

कथे मागची गोष्ट – आणि एआयचं योगदान
हा लघुपट म्हणजे एक सर्जनशील प्रयोग होता. हा फक्त एक शॉर्ट फिल्म नाही, तर क्रिएटिव्हटी आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयाचा प्रवास होता.

➡️ एआय-आधारित व्हिज्युअल्स: वृद्ध पात्र, वटवृक्षाखालील टपरी, वाफाळणारा चहा, सकाळचं कोवळं ऊन—हे सर्व दृश्य AI टूल्स वापरून हायपररिअलिस्टिक स्वरूपात तयार करण्यात आले.
➡️ प्रॉम्प्ट डिझाईन: प्रत्येक सीनसाठी अनेक वेळा शब्दरचना (prompts) बदलावी लागली. योग्य प्रकाश, भावनांचा लहेजा आणि दृश्यांची सुसंगती साधणं हे एक आव्हान होतं.
➡️ नॅरेशनचा संघर्ष: भावनिक संवाद AI आवाजातून मिळवणं अत्यंत कठीण होतं. शेवटी समजलं—जिथे भावना खोलवर आहेत, तिथे मानवी आवाजच खरी जादू करतो.

अर्निमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या वेबसाइटला भेट द्या: www.arnima3d.com
🕊️ हा लघुपट YouTube वर येथे पाहता येईल:
🔗 https://youtu.be/XAb9TZD9cW4


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading