डॉ. सा. रे. पाटील अखिल भारतीय कथा स्पर्धेचा निकाल जाहीर- डॉ. विजयकुमार माने, प्रा. सुरेश आडके प्रथम
शिरोळ: मासिक इंद्रधनुष्य व साहित्य सहयोग दीपावली यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक डॉ. विजयकुमार माने (मिरज) व प्रा. सुरेश आडके (कडेगाव, तालुका वाळवा) यांच्या परदेशातील देशी मुलगा व सौंदड या कथांना विभागून देण्यात आला आहे.
स्पर्धेचे हे आठवे वर्ष असून या कथा स्पर्धाना देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हरिद्वार, इंदूर पासून विविध राज्यातून ७८ कथाकारांनी स्पर्धेत भाग घेतला. परीक्षकांनी निकाल जाहीर केला असून द्वितीय क्रमांक हरिश्चंद्र पाटील (टेंभुर्णी) यांच्या काळकुट या कथेला तसेच संजय आप्पासाहेब सुतार (नांदणी) यांच्या इस्कोट या कथेला देण्यात आला आहे. तृतीय क्रमांक सचिन कोरोचीकर (शिरोळ) यांच्या रक्षाबंधन व रावसाहेब पुजारी (तमदलगे) यांच्या कातरबोण या कथांना विभागून देण्यात आला आहे.
उत्तेजनार्थ पारितोषिके कॅप्टन वरद पाटील (खिद्रापूर) यांच्या टायगर या कथेला तसेच सोनाली सचिन कुंभोजे (गौरवाड) यांच्या बळीराजाची खोटी आशा या कथेला आणि सौ. विद्या राजेंद्र पाटील (रिळे, तालुका शिराळा) यांच्या पाप पुण्याची बेडी या कथांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे बक्षिसाचे स्वरुप आहे.
बक्षीस वितरण समारंभ डिसेंबरमध्ये होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती साहित्य सहयोगचे संपादक सुनील इनामदार व मासिक इंद्रधनुष्यचे कार्यकारी संपादक डॉ. मोहन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ताज्या अपडेट मिळण्यासाठी Follow the इये मराठीचिये नगरी channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029Va5aD2hInlqQejBKIv3p

Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.