किसानपुत्र
माझ्या कृषी प्रधान देशात
शेतकरी जातोय मरून
रोज मातीत राब राबून
मरतो आत्महत्या करून
उभ्या जगाला पोसण्याला
दिनरात शेतात जागतो
सृजनशिल तोच आहे खरा
श्रमाची किमंत तो मागतो
अनुदानाचे दाणे टाकून
पिजऱ्यात बळीला डांबले
स्वातंत्र हिरावून घेतल्याने
बळीराज्याचे जगणे थांबले
न्यायबंदीचे साखळदंड
हातीपायी त्याच्या बांधले
अन्नदाता पराधीन करून
व्यवस्थेने काय साधले?
शेती तोट्या बट्याचा धंदा
आता जगात जाहीर झाले
बापाच्या न्याय हक्का साठी
"किसानपुत्र" रस्त्यावर आले
दत्ता वालेकर, घाटनांदूर,
ता. अंबाजोगाई, जि.बीड
मो. 9421440922
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
