June 25, 2025
Maratha Mandir literary award trophy placed next to a debut author's first published Marathi book"
Home » नवोदितांच्या प्रथम प्रकाशनासाठी मराठा मंदिरतर्फे साहित्य पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

नवोदितांच्या प्रथम प्रकाशनासाठी मराठा मंदिरतर्फे साहित्य पुरस्कार

मुंबई – येथील मराठा मंदिर गेल्या सात दशकांपासून महाराष्ट्रभर शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच कला आणि साहित्य क्षेत्रातील कार्यरत अशी अग्रणी संस्था आहे. अशा संस्थेला ७९ वर्ष पूर्ण झाली आहेत. या संस्थेच्या साहित्य शाखेतर्फे नवोदित साहित्यिकांच्या कलाकृतींना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने साहित्यिकांच्या प्रथम प्रकाशनासाठी पुरस्कार व सन्मानचिन्ह देण्यात येते. पुरस्काराचे हे यंदाचे आठवे वर्ष आहे.

०१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित कांदबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, समिक्षणात्मक ग्रंथ, बालवाङ्मय, संशोधनात्मक ग्रंथ, चरित्र (आत्मचरित्र / व्यक्तिचित्रण), प्रवासवर्णन, ललित वाङ्मय, मराठी साहित्यातील अन्य कोणताही प्रकार या पुरस्कार योजनेसाठी पात्र असेल. मान्यवर साहित्यिकांकडून या पुस्तकांचे परिक्षण केले जाणारा आहे. यासाठी प्रथम प्रकाशित पुस्तके ३१ मे २०२५ पूर्वी संस्थेच्या पत्त्यावर पाठविण्यात यावीत, असे आवाहन मराठा मंदिर साहित्य शाखेतर्फे करण्यात आले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
डॉ. नितीन श्रीकृष्ण विचारे,
अध्यक्ष, मराठा मंदिर साहित्य शाखा, ३रा मजला, मराठा मंदिर इमारत, मराठा मंदिर मार्ग, बाबासाहेब गावडे चौक, मुंबई ४०० ००८.
दूरध्वनी क्र. ०२२-६६०४४१५० / भ्रमणध्वनी – ९३२४९४२३७७,
ई-मेल – marathamandir@hotmail.com


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading