संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन…
सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,
गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली
म्हशी बुडताना, गायी वाहताना, दाव सोडता आले नाही
वावरा मध्ये राबणाऱ्या बैलाला बाहेर काढता आले नाही
जिथे लोक आधी उन्हामुळे होरपळत होते
आणि आता पाण्यामुळे सडत आहेत
सोयाबीन आणि कपाशीचे पीक वाया गेले आहे
नदी गावामधून वाहिली आहे
गल्लीमध्ये आयुष्यात पहिल्यांदा बोट फिरताना पाहिली
म्हैशी आणि गाई पुरात वाहून गेल्या आहेत,
त्यांना वाचवता आले नाही
शेतात राबणाऱ्या बैलांना बाहेर काढता आले नाही
माती खरवडली, वावर खचलं, आयुष्यच टिचलं
आता कसं जगायचं, अख्ख आभाळच कोसळलं
कोणाकडे काय मागायचं, अख्ख आभाळच कोसळलं
मदत म्हणून थोडा आधाराचा श्वास धाडा
कारण काल उन्हामध्ये जळत होता
मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
