छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘२०२५’चे वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे यांना जाहीर झाले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
‘नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर ( छत्रपती संभाजीनगर ) यांना ‘अनोखे थायलंड’ या प्रवासवर्णनपर पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. ‘प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार’ सचिन कुसनाळे ( म्हैसाळ ) यांना ‘गांधी वाद आणि वास्तव’ या वैचारिक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे. ‘बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कार’ पांडुरंग मुरारी पाटील ( कपिलेश्वर, ता. राधानगरी ) यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीला जाहीर झाला आहे. रोख तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
रा. ज. देशमुख स्मृतिपुरस्कार मागील अर्ध्या शतकापासून ग्रंथवितरण व प्रकाशन क्षेत्रात काम करणारे कैलाश पब्लिकेशन संस्थेचे अनिल अतकरे (छत्रपती संभाजीनगर) यांना जाहीर झाला आहे. दोन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेने संजीव कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथनिवड केली असून या समितीत संजीव कुळकर्णी व डॉ विश्वाधार देशमुख, सुहास देशपांडे यांचा समावेश आहे. रा. ज. देशमुख स्मृति पुरस्काराची निवड डॉ. दादा गोरे, डॉ. अनिरुद्ध मोरे आणि डॉ. विष्णू सुरासे यांच्या समितीने केली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.