October 25, 2025
मातृमंदिर विश्वस्त संस्था, निगडी पुणे तर्फे २७ वे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर. डॉ. विश्वास मोरे, रोहन उपळेकर, डॉ. के. वा. आपटे यांना प्रमुख सन्मान.
Home » मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती विश्वाचे आर्त

मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे देण्यात येणारे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा या पुरस्कार योजनेसाठी संस्थेकडे ३२ पुस्तके परीक्षणासाठी उपलब्ध झाली होती. याचे परीक्षण डॉ. राधाताई गोडबोले आणि डॉ. रजनीताई पतकी या दोन परीक्षकांनी केले. त्यांनी विविध गटामध्ये पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड केली, अशी माहिती कार्यवाह म. व. देवळेकर यांनी दिली आहे.

संत वाड़मय पुरस्काराचे यंदाचे हे २७ वे वर्ष आहे. परीक्षकांनी पुरस्कारासाठी निवड केलेली पुस्तके अशी –

गट क्र. १ ( चिंतनपर, विवेचनपर पस्तके )
(पुरस्कार रक्कम लेखकांना ६० % आणि प्रकाशकांना ४० % दिली जाते)
प्रथम क्रमांक ( पुरस्कार रु.८०००/- ) – पाऊले तुकोबांची – लेखक : डॉ. विश्वास मोरे, प्रकाशक : जगद्गुरु प्रकाशन, भंडारा डोंगर, इंदोरी, पुणे.
द्वितीय क्रमांक ( पुरस्कार रु. ६०००/-) – विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ – लेखक : रोहन विजय उपळेकर, प्रकाशक : श्रीहरिपाठ सेवा प्रतिष्ठान, फलटण, सातारा
तृतीय क्रमांक ( पुरस्कार रु.४०००/-) – विभागून
१) आद्य श्रीशंकराचार्य -कृत सर्व-वेदांत-सिद्धांत-सार-संग्रह – लेखक : प्रा. डॉ. के. वा. आपटे – प्रकाशक : नारायण केशव आपटे, सांगली.
२) पुर्णकळा – लेखक : नारायण रघुनाथ देशपांडे, प्रकाशक : गायत्री गोविंद कुलकर्णी

विशेष पुरस्कार (पुरस्कार रु. ३०००/- फक्त लेखकासाठी)
१) क्रांतदर्शी महात्मा बसवेश्वर – लेखक : डॉ. श्यामा घोणसे, संपादक : भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन
२) || श्रीगणेशगीतासार || – लेखक: विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे, प्रकाशक : लतिका प्रकाशन. पुणे.

गट क्र. २ ( संत जीवन – ललित साहित्य )
( पुरस्कार रक्कम लेखकांना ६० % आणि प्रकाशकाना ४० % दिली जाते .)
( पुरस्कार रक्कम रु. २५००/- प्रति पुस्तक)
१) षट् – पंचाशिका – लेखक: प्रा. डॉ. के. वा. आपटे, प्रकाशक : नारायण केशव आपटे, सांगली.
२) सार्थ श्रीरामगीता – लेखक : डॉ. सौ. सुनीती सहस्रबुद्धे, प्रकाशक : श्री. बा. ढवळे

या पुरस्कारांचे वितरण २२ नोव्हेंबर २०२५ (शनिवार ) या दिवशी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत मनोहर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे ४४ येथे होणार आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading