सध्या अनेक ठिकाणी नागदोन ही शोभेची वनस्पती म्हणून लावलेली पाहायला मिळते. शेतकऱ्यांच्या बांधावरही ही वनस्पती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. या वनस्पतीला कीड लागत नाही. वाळवीसह अन्य किटकांचा प्रतिबंध करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. कीडनाशकाबरोबरच जमिनीची धूप होण्यापासूनही रक्षण करते.
नागदोनचे औषधी उपयोग –
- मुळव्याध, भगंधर त्रास कमी करण्यासाठी या वनस्पतीच्या पानांचा उपयोग केला जातो. नागदोनची पाने अन् काळीमिरी एकत्रित सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास चार ते पाच दिवसात मुळव्याधचा त्रास कमी होईल.
- रक्तशुद्धी व रक्तस्राव थांबवण्यासाठी उपयुक्त.
- मासिकपाळीचा त्रास असणाऱ्या महिलांसाठीही ही वनस्पती उपयुक्त.
डॉ. मानसी पाटील
- अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे !
- महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील जैवविविधतेचे तळागाळातील संवर्धन सक्षम करण्यास प्रोत्साहन
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.


