पुणे : येथील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२५-२६) अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील यांची, तर सरचिटणीसपदी मंगेश फल्ले व खजिनदारपदी दिलीप तायडे यांची निवड झाली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०२५-२६) अध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष, खजिनदार व कार्यकारिणी सदस्य या पदांसाठी रविवारी ( दि. २९) रोजी मतदानाद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. प्रताप परदेशी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. स्वप्नील जोशी यांनी काम पाहिले.
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : ब्रिजमोहन पाटील (दै. सकाळ), सरचिटणीस : मंगेश फल्ले (दै. दिव्य मराठी), खजिनदार : दिलीप तायडे (दै. केसरी), उपाध्यक्ष : राजा गायकवाड (दै. महाराष्ट्र टाइम्स), सागर आव्हाड (साम टीव्ही), चिटणीस : नीलेश चौधरी (दै. पुण्यनगरी), तनिष्का डोंगरे (दै. सकाळ), कार्यकारिणी सदस्य : लक्ष्मण खोत (दै. भास्कर), राजाराम पवार (दै. सामना), दत्तात्रय आढाळगे (दै. सामना), अतुल चिंचली (दै. लोकमत), नरेंद्र साठे (दै. सकाळ), आशिष देशमुख (दै. पुढारी), समीर सय्यद (दै. नवभारत), विक्रांत कुलकर्णी (दै. केसरी), तेजस टवलारकर (दै. महाराष्ट्र टाइम्स), सज्जाद सय्यद (ई टीव्ही भारत).
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
