उत्पादन वाढीसाठी पेरणीची योग्यवेळ साधणे महत्त्वाचे असते. कीड-रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रब्बी ज्वारीच्या पेरणीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे यासाठी या काही टिप्स…
डॉ. सुरेश आंबेकर
खरीप ज्वारीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण आल्यामुळे रब्बी ज्वारीला आता आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. ज्वारी हे पीक आता श्रीमंत अन्न म्हणून संभोधले जाते. आणि या वर्षीच्या वरुण राजाची कृपा पहिली असता रब्बी ज्वारी क्षेत्र हमखास वाढणार आहे. मराठवाड्यात ऑक्टोंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर पश्चिम महाराष्ट्रात लवकर म्हणजे गोकुळ अष्टमी नंतर रब्बीज्वारीची पेरणी करतात. पण यंदा निसर्गाचा विचार केला तर सप्टेंबर महिन्याच्या सततच्या पावसामुळे पेरणी करणे अशक्य वाटत आहे. अशा परिस्थितिमध्ये पेरणी केल्यास खोड माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी शेतकर्यांनी परतीचा पाऊस थांबेपर्यंत रब्बी ज्वारीची पेरणी करू नये. यंदा चांगला पाऊस पडत असल्याने जमिनीतील ओलावा भरपूर दिवस टिकून राहणार आहे. यासाठी रब्बी ज्वारी पेरणीची घाई करू नये. पावसाने उघडीप दिली की 20 ते 25 ऑक्टोंबरपर्यंत पेरणी केली तरी उत्पादनात फार घट होणार नाही.
रब्बी ज्वारीचे उत्पादन वाढविण्याची पंचसूत्री…
१. योग्य वाणाची निवड :-
परभणी मोती, अकोला क्रांती, फुले वसुधा, फुले चित्रा, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले सुचित्रा
२. पेरणी पद्धत आणि अंतर :-
पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी पेरणी पूर्वी १० ते १५ दिवस आधी जमिनीत सऱ्या किंवा वाफे करणे योग्य दोन ओळीतील अंतर ४५ से मी [१८ इंच ] तर दोन झाडातील अंतर १०ते१२ से मी ठेवणे गरजेचे.
३. लागणारे बियाणे आणि बीजप्रक्रिया:-
हेक्टरी १० किलो प्रमाणित बियाणे पेरावे. कणसावरील कानी प्रतिबंधासाठी पेरणीपूर्वी बियाणास ३०० मेष पोताचा गंधकाची ४ किंवा थायरम ३ ग्रॅम प्रती किलो प्रमाणात प्रक्रिया करावी. खोड माशीच्या प्रतिबंधासाठी थ्योमेथाझाम {कृसर } ७० डब्लू एस २.५ ग्रॅम प्रती किलो बीज प्रक्रिया करावी
४. रासायनिक खताचा वापर –
पेरणी करताना कोरडवाहू ज्वारीसाठी हेक्टरी ४० किलो नत्र +२० किलो स्पुरद जमिनीत खोल {१२ से मी }पेरून दिल्यास उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते. ओलितासाठी ८० किलो नत्र +४० किलो स्पुरद+४० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. त्यामधील अर्धे नत्र आणि पूर्ण स्पुरद व पालाश पेरणीबरोबर आणि अर्धे नत्र पिक ३५ ते४० दिवाचे असताना पाण्याच्या पाळी बरोबर दिल्यास उत्पादनात २ते २.५ पट वाढ होते तीबक पद्धत ने देखील उत्पादनात २ते ३ पट वाढ होते.
५. आंतर मशागतीद्वारे ओलावा साठवणूक :-
रुंद [४५ सेमी ]अंतरावर ज्वारीची पेरणी केल्यास पिकामध्ये कोळप्याच्या मदतीने दोन वेळेस अंतर मशागत करता येते. त्यामुळे जमिनीतल्या पाण्याची धूप होत नाही. साहजिकच यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते आणि निंदनीचा खर्च कमी होतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.