October 26, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ मंजूर केली. गहू, हरभरा, मसूर, मोहरी, करडई शेतकऱ्यांना योग्य हमीभाव.
Home » रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ

विपणन हंगाम 2026-27 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्‍ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम 2026-27 मध्ये सर्व प्रमुख रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली.

उत्पादकांना त्यांच्या शेत मालासाठी योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने विपणन हंगाम 2026-27 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केली आहे. करडईसाठी किमान आधारभूत किमतीत  600 रुपये प्रति क्विंटल  सर्वाधिक वाढ जाहीर करण्यात आली आहे,  त्यापाठोपाठ कडधान्य (मसूर) साठी 300 रुपये प्रति क्विंटल दराने किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ जाहीर करण्यात आली. रॅपसीड आणि मोहरी च्या एमएसपी मध्ये  प्रति क्विंटल 250 रुपये, हरभरा प्रति क्विंटल 225 रुपये,  बार्ली प्रति क्विंटल 170 रुपये  आणि गव्हाच्या एमएसपी मध्ये प्रति क्विंटल 160  रुपयांची वाढ झाली आहे.

विपणन हंगाम 2026-27मधील सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमती

(रु. प्रति क्विंटल)

CropsMSP RMS 2026-27Cost*of Production RMS2026-27Margin over cost(in percent)MSP RMS 2025-26Increase in MSP(Absolute)
Wheat258512391092425160
Barley21501361581980170
Gram58753699595650225
Lentil (Masur)70003705896700300
Rapeseed & Mustard62003210935950250
Safflower65404360505940600

*खर्चाचा संदर्भ यात शेतमजुरी, बैलांची मजुरी/यंत्रांचा खर्च, भाडेतत्वावरील जमिनीचे भाडे, बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन खर्च, अवजारे आणिशेतीच्या इमारतींवर घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप चालवण्यासाठी डीझेल/वीज हा सर्व खर्च, आणि विविध  खर्च आणि कुटुंबाचे श्रम हा सर्व खर्च समाविष्ट आहे.

विपणन हंगाम 2026-27 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपीमधील वाढ केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मधील, देशभरातील पिकांच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या घोषणेला अनुसरून आहे.

देशभरातील भारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित फरक, गव्हासाठी 109 टक्के, त्यापाठोपाठ रॅपसीड आणि मोहरी 93 टक्के, मसूरसाठी  89 टक्के, हरभरा 59 टक्के, बार्ली 58 टक्के, आणि करडईसाठी 50 टक्के इतका आहे.

रब्बी पिकांच्या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला फायदेशीर भाव मिळेल आणि पिकांमधील विविधतेला प्रोत्साहन मिळेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading