बागणी – बहादुरवाडी (ता. वाळवा) येथील कवी धनाजी धोंडिराम घोरपडे यांच्या ‘ जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितासंग्रहास महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेजचा शैला सायनाकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काॅलेजच्या वार्षिक समारंभात पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी यावर्षीपासून हा पुरस्कार सुरु केला आहे. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उत्कृष्ट कवितालेखनासाठीचा यावर्षीचा पहिला ‘शैला सायनाकर काव्य पुरस्कार पुरस्कार’ श्री. घोरपडे याच्या कवितासंग्रहास मिळाला आहे.
तो कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेजमधील मराठी विभागाकडे पदव्युत्तर स्तरावर प्रथम वर्षामध्ये अध्यापन करतो. मुंबईच्या ललित पब्लिकेशनने त्याचा हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. या कवितासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेचा लोकनेते राजारामबापू उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
यापूर्वी ‘गा-हाणं’ हा त्याचा पहिला संग्रह प्रकाशित झाला असून त्या संग्रहाला पद्मश्री नारायण सुर्वे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, शांता शेळके उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, महाकवी कालिदास साहित्य पुरस्कार, तापी- पुर्णा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार , दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार इत्यादी साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. एन. आर. पाटील, जनरल सेक्रेटरी सरोज पाटील (माई) उपाध्यक्ष सुनिल पाटील, प्राचार्य डाॅ.नितीन शिंदे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. या यशासाठी त्याला प्रा. एकनाथ पाटील, प्रा. सुजाता चोपडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.