काही भाजीच्या साली काढूनच टाकाव्या लागतात उदा. बीट. सालीमध्ये तर सर्वात जास्त व्हिटॅमिन्स असतात. साली खाता ही येत नाहीत आणि फेकताना ही हळहळ वाटते. यावर एक चांगला उपाय आहे.
बीट अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचा. त्याची साल काढून घेतल्यानंतर त्या साली अंदाजे दोन तीन कप पाण्यामध्ये टाकून उकळायच्या. बीटचा लालसर रंग चांगला सालीमध्ये उतरला की गॅस बंद करून ठेवायचा. ते पाणी गाळून घ्यायचे.
या पाण्यात साली मधले सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स आलेले आहेत. हे पाणी तुम्ही भाज्या शिजताना आमटीमध्ये सूप मध्ये वापरू शकता. याचे चांगले सरबतही बनते. लहान मुलांनावृद्धांना हे पाणी जरूर प्यायला द्या, ताकद मिळते.
डॉ. वर्षा जोशी
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क
सासने ग्राउंड जवळ, कोल्हापुर
9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.