आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग…
तुम्ही कितीही,
विष ओकत राहा.
आंबेडकरांविषयी,
आणि, काढून टाका त्यांना,
पाठ्यपुस्तकातून,
किंवा, अभ्यासक्रमातून.
सत्तेची सूत्र तुमच्याकडे,
आहेत म्हणून.
कोणी , कितीही प्रयत्न केला,
तरी ,काढून टाकू शकत नाही ,
आंबेडकरां सह ,बुध्द, बसवण्णा,
फुले, शाहु यांना.
इथल्या मूळ निवासी,
भारतीयांच्या काळजातून,
आणि मनातून.
ते रूतून बसलेत ,
आमच्या तनात,
नसानसात.
कधीच पोचू शकत नाहीत.
तिथपर्यंत तुमचे हात,
तुम्ही बसा वाचत,
स्वर्ग ,नरकाच्या काल्पनिक कथा.
आम्ही भारतातच,
निर्माण करू स्वर्ग .
आंबेडकरांनी दिलेल्या,
संविधानाच्या माध्यमातून.
राजा माळगी 94217113 67
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.