दिवाळी अंक स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
जयसिंगपूर – संग्रहालय, अभिलेखागार, अभिलेख और पुस्तकालय सेवा संस्थान आणि आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘दिवाळी अंक स्पर्धा २०२४’ साठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वीच्या निवेदनानुसार स्पर्धकांना दिवाळी अंक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र स्पर्धकांच्या मागणीनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी दिवाळी अंकाच्या तीन प्रती स्पीड पोस्टाने पाठवाव्यात, असे आवाहन स्पर्धा व मूल्यमापन मंडळाचे संयोजक डॉ. सुनील दादा पाटील यांनी केले आहे.
मराठी दिवाळी अंकाना ११६ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक आणि मराठी माणूस यांचे अतूट नाते आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटने तर्फे गेली ३१ वर्षे सातत्याने सभासदांसाठी दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या दमाच्या आणि कसदार लेखन करणार्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते.
त्याचबरोबर दिवाळी अंकांच्या संपादक व प्रकाशकांचे एक दिवशीय अधिवेशनाचे आयोजन केले जाते. दिवाळी अंक स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्या संपादक / प्रकाशक (अधिकृत सभासद) यांनी आपल्या ख्रिसमस (नाताळ) विशेषांक / दिवाळी अंकाच्या ३ प्रती, कव्हरिंग लेटरसह १५ डिसेंबर २०२४ पूर्वी पाठवाव्या.
जागतिक पुस्तक दिन हा २३ एप्रिल रोजी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो; त्याचदिवशी साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणार्या कवितासागर साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्या मान्यवरांच्या उपस्थित जयसिंगपूर येथे होईल.
दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता –
International Diwali Ank Association आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना
द्वारा, कार्यकारी संचालक – डॉ. सुनील दादा पाटील, कवितासागर, पोस्ट बॉक्स ६९, नांदणी नाक्याजवळ, बायपास रोड, जयसिंगपूर – ४१६१०१, तालुका – शिरोळ, जिल्हा – कोल्हापूर, संपर्क: ९९७५८७३५६९, ८४८४९८६०६४
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.