September 7, 2024
Chance of moderate to heavy rains from Ekadashi to Gurupurnima
Home » एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
काय चाललयं अवतीभवती

एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

 आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ

माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495

१- पावसाची हजेरी –

गेल्या चार (१४ते १७ जुलै) दिवसादरम्यान, वर्षाच्छायेचा प्रदेशातील ६ जिल्हे (धुळे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर) वगळता कोकण, सह्याद्रीच्या घाट माथा सहित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली.
             
२-पुढील पाच दिवसातील पाऊस ?

आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे रविवार दि. २१ जुलै गुरुपौर्णिमेपर्यन्त मुंबईसह कोकण व विदर्भातील अठरा जिल्ह्यात जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

३-पावसासाठी पूरक प्रणाल्या प्रणाल्या

दिड किमी. उंचीचा मान्सून ट्रफ झुकला दक्षिणेकडे –
अ. समुद्रातील ऑफ शोर ट्रफ 
९०० मीटरवर सौराष्ट्र व कच्छवर चक्रिवादळ वाऱ्याची स्थिती
३१०० मीटर च्या वर साडेचार किमी जाडीतील  नाशिक ते वाशिम, गडचिरोली वरून जाणारा शिअर झोन
परवा शुक्रवार १९ ला बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होणार

४-जोरदार व सलग पावसाचा अभाव का ?         

मान्सूनच्या ‘सक्रियता व कमकुवतता ‘ चे हेलकावे अजूनही संपलेले नाहीत. त्यामुळे मान्सूनच्या बळकट सक्रियेतून व्यापक परिक्षेत्रावर अधिक काळ सतत पडणारा झडीच्या पाऊस कोकण व विदर्भ, वगळता महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही. परंतु सध्य:स्थितीतील हे वातावरणीय प्रणल्या बघता ही स्थिती निवळेल, असे वाटते.

५-धरण जलसाठ्याची अवस्था ?

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या ४ जिल्ह्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर ६४० किमी. लांबी व पूर्व-पश्चिम १० ते २० किमी. रुंदीच्या  नद्या उगम व धरण पाणलोट क्षेत्रातील  त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी,  ताम्हिणी, वेल्हे, भोर, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, गगनबावडा, राधानगरी इ. घाटमाथ्यावरील पट्ट्यात मान्सूनची कामगिरी सध्या उत्तम  होत आहे. शिवाय सध्याच्या वातावरणीय प्रणाल्याही पूरक जाणवतात.
त्यामुळे जुलैअखेर, कदाचित जलसंवर्धनातून धरणसाठ्याची टक्केवारीही कमीतकमी ७० टक्क्यांपर्यन्त  पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

६-शेवटच्या टप्प्यातील शिल्लक पेरण्या?

ज्या शेतकऱ्यांच्या चांगल्या ओलीअभावी खोळंबलेल्या पेरण्या ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता जाणवते. खरीपपेरीचा हा शेवटचा टप्पा समजावा.

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गणेश चतुर्थीः पाव झडकरी तुका म्हणे

FPC : अभी नही तो कभी नही

रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading