आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे
मोबाईल – 9423217495
सध्या भारत महासागर वि्षुववृत्तीय परिक्षेत्रात असलेली एम. जे.ओ. ची उपस्थिती आणि सध्या होत असलेली कमाल तापमानातील वाढ, ह्यामुळे पुढील संपूर्ण सप्ताहात म्हणजे रविवार (२५ ऑगस्टपर्यन्त) संपूर्ण महाराष्ट्रात शक्यतो दुपारनंतर, ‘उष्णता संवहनी’ प्रक्रियेतून विजा व गडगडाटीसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
तारखेनुसार विविध जिल्ह्यात मात्र जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता अशी असु शकते.👇
२० ऑगस्ट – नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे अकरा जिल्हे
२१ ऑगस्ट –मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ-अठरा जिल्हे
२२ व २३ऑगस्ट- नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, कोल्हापूर व मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ- असे तेवीस जिल्हे
२४-ऑगस्ट- नंदुरबार, धुळे, जळगांव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी व मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ – असे सव्वीस जिल्हे
२५ ऑगस्ट – मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील २८ जिल्हे (मराठवाड्यात मात्र २५ ला मध्यम पाऊस)
महाराष्ट्रातील सर्व धरणक्षेत्रातील पुन्हा जल-आवकेत वेगाने वाढ होवु शकते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.