December 18, 2024
Cold wave in Maharashtra
Home » महाराष्ट्रात थंडीची लाट
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात थंडीची लाट

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

महाराष्ट्रात थंडीची लाट

आज व उद्या  ( रविवार व सोमवारी दि. १५ व १६ डिसेंबर ) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ चे किमान तापमानं हे बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले असुन ही तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत खालावून जळगांव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा ह्या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवते.

सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवार दि. १८ डिसेंबर (संकष्टी चतुर्थी) पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता ही कायम आहेच.

खान्देशांतील नंदुरबार, धुळे, जळगांव अश्या तीन जिल्ह्यात काही ठिकाणी सरासरी असलेल्या साधारण दवांक बिंदू तापमान व वाढलेल्या आर्द्रतेमुळे अति खालावलेल्या किमान तापमानातून, भू-स्फटिकीकरण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading