भात पिक सल्ला 🌾🌾 ✨ बीजप्रक्रिया
लागवडीपूर्वी भात बियाणे ३ टक्के मिठाच्या द्रावणात (१० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून द्रावण करावे) बुडवावे. त्यानंतर पाण्यावर तरंगणारे हलके बी काढून नष्ट करावे. भांड्याच्या तळाशी राहिलेले जड बी दोन ते तीनवेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक व जिवाणूनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
करपा, पर्ण करपा, तपकिरी ठिपके, उदबत्ता आणि आभासमय काजळी नियंत्रणासाठी, प्रतिकिलो बियाण्यास कार्बेन्डाझिम किंवा बेनलेट ३ ग्रॅम या प्रमाणे चोळावे.
कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, अॅग्रीमायसीन २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बियाणे आठ तास भिजवावे.
त्यानंतर बियाण्यावर ॲझोटोबॅक्टर २५० ग्रॅम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो याप्रमाणे किंचित ओलसर करून हलक्या हाताने चोळावे. सावलीत अर्धा तास सुकवून त्वरित पेरणी करावी.
( सौजन्य – कृषक )
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.