कोल्हापूर-बालींगे-कळे-साळवन-ते गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला
कोल्हापूर, दि. 29 : राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.२, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी (कोल्हापूर-बालींगे-कळे-साळवन-ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी ७९/५०० बालींगे – भोगावती नदीवरील अस्तित्वातील जुन्या दगडी कमानी पुला खालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीच्या खाली आली असल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र. २, कोल्हापूरचे उप अभियंता आर. बी. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाणी पातळी २९ जुलै रोजी रात्री अकरा वाजता 45’06” ( 544.05m ) इतकी होती. जिल्ह्यातील ८१ बंधारे अद्यापही पाण्याखाली असून राधानगरी धरणातून 64734 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
२८ जुलै रोजीची पुरस्थिती दर्शविणारा हा व्हिडिओ तयार केला आहे ओंकार मिराशी यांनी…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.