January 14, 2025
Kolhapur WordCamp receives overwhelming response from digital professionals and students
Home » डिजिटल व्यावसायिक अन् विद्यार्थ्यांचा कोल्हापूर वर्डकॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद
संशोधन आणि तंत्रज्ञान

डिजिटल व्यावसायिक अन् विद्यार्थ्यांचा कोल्हापूर वर्डकॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर – येथे सांस्कृतिक पदभ्रमंतीने सुरु झालेल्या वर्डप्रेसचा वर्डकॅम्पने जिल्ह्याच्या डिजिटल क्षेत्रात विकासाचे एक मोठे पाऊल टाकले आहे. युवकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने आणि वेबडेव्हल्पर, डिझायनर, कोडर, ब्लॉगर, युट्युबरसह देशभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी हा कार्यक्रम जिल्ह्याच्या तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती करू पाहात आहे. देशभरातून आलेल्या सहभागींना कोल्हापूरची संस्कृती, जेवण आणि मातृभूमीशी असणारी जवळीकता खूप भावली. ही भावना प्रत्येक सहभागी व्यक्तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. पहिल्याच प्रयत्नात झालेल्या या कार्यक्रमामध्ये तीनशेच्यावर वर्डप्रेसप्रेमींनी सहभाग नोंदविला.

सांस्कृतिक पदभ्रमंतीची सुरूवात जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरातून झाली. अन् दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ सांगता झाली. या मार्गावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सुरू असलेली पुजा पाहून अनेकजण भारावून गेले. शहरातील ऐतिहासिक स्थळे अन् त्यांच्या इतिहास याबद्दल उमेश जामदार यांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी आयोजित कार्यशाळेमध्ये सुमारे शंभरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये आदित्य काणे, योगी लोंढे, गौतम नावडा, मयंक कुमार, राहुल सरकार यांनी वर्डप्रेसची ओळख करून दिली. तर वर्डप्रेस संघटनेतर्फे wordpress.org आयोजित मराठी अनुवाद, कोडींग, थीम निर्मिती अन् आकर्षक छायाचित्रे अपलोड आदी संदर्भातील कार्यशाळेत प्रथमेश पालवे, तरुण पारसवानी, सत्यम विश्वकर्मा, अरूण शेणॉय, विशाल मुकादम, प्रेम तिवारी, चेतन प्रजापती यांनी मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशीच्या करिअर संदर्भातील चर्चासत्रामध्ये एलव्हिना गोवेस (बारदेस्कर), गौतम नावडा, मेहेर बाला, तरुण पारसवानी, हर्षवर्धन खोलापूरकर यांनी सहभागी नोंदविला. या व्यतिरिक्त जिनेंद्र खोबरे, प्रीतम सोनोने, राहुल डी सरकार, श्रीशैल विटकर, सिद्धांत वाधवानी, प्रेम तिवारी, अरुण शेनॉय, अभिष डोक्रस, शिवानंद शर्मा, मौलिक व्होरा, अभय कुलकर्णी, अक्षया राणे, अरविंद बारस्कर, केतन निरुके, सुरज सुतार अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

हा वर्डकॅम्प यशस्वी होण्यासाठी मकरंद माने, प्रताप पाटील, डॉ. जयदिप पाटील, निलेश शिरगावे, राजेंद्र घोरपडे, सुहानी इंगळे, सायली मोकाशी, प्रशांत पाटील, एलव्हिना गोवेस (बारदेस्कर) या संयोजकांनी विशेष प्रयत्न केले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading