पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील निवड झालेल्या लेखकांना आणि कवींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी आणि ज्येष्ठ साहित्यिक, समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.
कार्यक्रमास राज्याचे भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी, परिषदचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ उपस्थित होते. या वर्षी कथा, कविता, कादंबरी, ललित आणि बालसाहित्य या पाच विभागांसाठी राज्यभरातून तब्बल १५५ पुस्तके प्राप्त झाली होती. परीक्षकांनी गुणवत्तेच्या आधारे १९ उत्कृष्ट साहित्यकृतींची पुरस्कारासाठी निवड केली.
कार्यक्रमाची सुरुवात रिचा राजन हिच्या सुमधुर गणेशवंदनेने झाली. त्यानंतर निवड झालेल्या साहित्यकृती आणि पुरस्कारप्राप्त लेखकांची घोषणा करण्यात आली.
पुरस्कृत साहित्यकृती आणि लेखक
✦ कथा विभाग
प्रथम : अविनाश हळबे – मृत्यूर्मा अमृतं गमय
द्वितीय : संजीवनी बोकील – कवडशांचे फूल
द्वितीय : प्रियांका कर्णिक – अवकाश पेलताना
तृतीय : शहाजी कांबळे – कथा संजीवनी
✦ कविता विभाग
प्रथम : सागर जाधव – माती मागते पेनकिलर
द्वितीय : दिनेश भोसले – सूर्य आहे पेरला
द्वितीय : निलेश शेंबेकर – क्षितिज पल्याड
तृतीय : डॉ. विनय तांदळे – निःशब्द काळजाची ओल
✦ कादंबरी विभाग
प्रथम : डॉ. किरण कुलकर्णी – अनामिकाची विचारधून
द्वितीय : नितीन शिंदे – डी पी होता म्हणून
तृतीय : नीला विवेक नातू – आनंदी रघुनाथराव
उल्लेखनीय : मेधा इनामदार – शर्मिष्ठा
✦ ललित विभाग
प्रथम : डॉ. अनिकेत मयेकर – स्टेथोस्कोप
द्वितीय : शुभदा कुलकर्णी – किनारे सावल्यांचे
तृतीय : निशा डांगे – कपाळ गोंदण
✦ बालसाहित्य विभाग
प्रथम : रश्मी गुजराथी – कळीची फजिती
द्वितीय : डॉ. श्रीकांत पाटील – रंगतदार नाट्यछटा
द्वितीय : हबीब भंडारे – निळे आभाळाचे डोळे
तृतीय : विनोद पंचभाई – मिशन मून
कार्यक्रमात डॉ. न. म. जोशी आणि गिरीश प्रभुणे यांनी पुरस्कार्थी लेखकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी लेखनासाठी प्रबोधनपर संदेश दिले. परीक्षक मंडळातील डॉ. रजनी शेठ यांनी निवडीचे निकष स्पष्ट केले. यावेळी पुरस्कार्थी म्हणून डॉ. किरण कुलकर्णी आणि शहाजी कांबळे यांनी प्रतिनिधिक मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजन लाखे यांनी केले. संजय जगताप आणि किरण लाखे यांनी उत्तम सूत्रसंचालन करून कार्यक्रम सुरेखपणे पार पाडला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
