June 17, 2025
Students at Shivaji University attending media and journalism training sessions for online journalism and film courses
Home » ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ऑनलाईन जर्नालिझम, फोटोग्राफी, शॉर्टफिल्म मेकिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात सुरु असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम, सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग या तिन्हीही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
हे तिन्हीही अभ्यासक्रम पार्ट टाईम आहेत. इतर कोणताही पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकत असताना किंवा नोकरी आणि व्यवसाय करतही हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.

विद्यापीठात फक्त शनिवार आणि रविवारी या कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. या तिन्हीही कोर्ससाठी वयाची कोणतीही अट नाही. पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम हा पदवीनंतरचा एक वर्षाचा कोर्स आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट कोर्स इन डॉक्युमेन्ट्री फोटोग्राफी आणि सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग हे दोन्ही कोर्स तीन महिने कालावधीचे असून ते बारावी पास असणार्‍या कोणालाही करता येतात.

या तिन्हीही अभ्यासक्रमासाठी अध्यासनात स्टुडिओ, विविध सॉफ्टवेअर्स, संगणक लॅब, कॅमेरे यासह अन्य सर्व सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login या लिंकवर कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी करावी. या तिन्हीही कोर्सबाबत अधिक तपशील हवा असल्यास विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात विद्यार्थ्यांनी सपंर्क करावा, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading