अहमदनगर : एप्रिल २०२३ ते आक्टोबर २०२४ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, लेखसंग्रह, कादंबरी, बालवाडमय, संशोधन ग्रंथ, समीक्षा ग्रंथाच्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक, कवींना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्र, कथा-काव्य लेखन स्पर्धा, पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.
यावर्षी सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली. पुस्तकांच्या दोन प्रती, परिचय, पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत साहित्य परिषदेकडे पाठवावीत असे आवाहन प्रा.डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, भारत गाडेकर, ज्ञानदेव पांडूळे, अजयकुमार पवार, बबनराव गिरी, राजेंद्र पवार, स्वाती ठूबे, शर्मिला गोसावी, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
शब्दगंध साहित्यिक परिषद,
फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावेडी,
अहमदनगर – ४१४००१
अधिक माहितीसाठी संपर्क – मो. ९९२१००९७५०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.