चंद्रपूर – शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने २०२४ चे राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी दिली.
या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्य मागविण्यात आले होते. पुरस्काराचे हे १६ वे वर्ष आहे.
सविस्तर निकाल असा –
काव्यसंग्रह
१) अल्काब – प्रा.संजय घरडे (अमरावती)
२) स्याडा कोटसा भरते – सुनिल बावणे (बल्लारपूर)
समीक्षाग्रंथ
१) बालकथा स्वरूप व व्याप्ती – रसूल दा. पठाण (उदगीर)
२) नामदेव ढसाळांची कविता – डॉ. विनोद राऊत (नागपूर)
३) साहित्यसमीक्षा आणि समाजचिंतन – संपा. डॉ. रुपेशकुमार कऱ्हाडे (दिग्रस)
४) वटवृक्षाच्या छायेखाली – संपा. दीपक शिव (वरोरा)
कथासंग्रह
१) शेलक्या बारा – इंद्रजित पाटील (रुई, जि-सोलापूर)
२) गाव विकणे आहे – डॉ. राज यावलीकर (अमरावती)
कादंबरी
१) मातीचे पाय – चंद्रकांत गावस (ठाकूरवाडा, गोवा)
२) धुळधाण – गंगाधर गायकवाड (परभणी)
आत्मकथन
१) क्षण.. सोनेरी रुपेरी आणि काटेरी – आनंद सांडू (चेंबूर)
२) दौशाड – डॉ. नंदकुमार राऊत (मुंबई)
प्रत्येक साहित्य प्रकारात कमीत कमी पाच पुस्तके येणे अपेक्षित होते. परंतु नाटक या साहित्यकृतीच्या पुरस्कारासाठी केवळ दोनच प्रस्ताव आल्यामुळे या पुरस्काराचा निकाल यावर्षी रद्द करण्यात आला. पुढील वर्षी आलेली नाट्यकृतीची पुस्तके विचारात घेऊन मग त्यातून दोन्ही वर्षीची पुस्तके ग्राह्य धरून नाटकाचे पुरस्कार दिले जातील, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
