उसाला रास्त भाव देण्यासाठी सायखेडा साखर कारखान्यावर एक डिसेंबरला किसान सभेने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात किसान सभेचे राजन क्षीरसागर यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
राजन क्षीरसागर यांचे शेतकऱ्यांना आवाहन,
साखरेच्या उताऱ्यामध्ये चोरी करायची ? उसाच्या वजन मापात लुट माप करायचं ? ऊस तोडणी वाहतुकीच्या खर्चामध्ये घोटाळे करायचे ? शेतकऱ्यांना लुटायचं ? कामगारांची पिळवणूक करायची ? कुठवरं हे चालायचं ? उसाला कल्पवृक्षासारखे पीक असताना त्याच्यासाठी वर्षभर मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याला घामाच दाम या ठिकाणी नाकारलं जातयं. दोस्तानो आता जाग झालं पाहीजे. माजलगाव तालुक्यामधील पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवाज उठवलेला आहे. सायखेडा कारखान्यावरती एक तारखेला धडक त्या ठिकाणी मारली पाहिजे. संपूर्ण मराठवाड्या मधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजुटीने धर्मजात, पक्ष, गट तट बाजूला सोडून ऊस उत्पादक शेतकरी या नात्याने एकजुटीची मशाल हातामध्ये घेतली पाहिजे. आपल्या न्याय हक्काचा पुकारा केला पाहिजे. तेच साखर कारखाने, चाचणी तेच घेणार , तपासणीही तेच करणार, तेच त्या ठिकाणी हिशेब मांडणार आणि आम्हाला सांगणार सात टक्के आला, आठ टक्के आला. केंद्र सरकार सव्वा दहा टक्केच्या रिकव्हरी वरती उसाची एफआरपी ठरवणार. अरे कुठे गेला न्याय? कुठे गेल्या त्या रंगराजन समितीच्या शिफारसी ? ज्या ठिकाणी उसाच्या उत्पादनातून सुद्धा मुनाफा शेतकऱ्यांना दिला पाहिजे. हा शेतकऱ्यांचा अधिकार म्हणून मान्य केला गेलेला आहे. मग या उसाला रक्कम रास्तभाव का मिळत नाही? काय भावाने साखर विकली जाते? काय भावाने इथेनॉल विकले जाते ? काय भावाने मोलॅशिस विकले जाते ? या बगॅसमधून तयार केलेल्या विद्युत निर्मितीच्या पैशाचं काय झालेला आहे ? कुठला मुनाफा या ठिकाणी मिळत नाही ? शेतकऱ्यांना सर्पनाचा सुद्धा भाव त्याठिकाणी आपल्या उसाला मिळत नाही. तळ हातावरच्या फोडा सारखा जपलेला ऊस हजार मुश्किली मधून पिकवलेले हे पीक, या पिकाचं सुद्धा घामाच दाम सुद्धा सरकार नाकारत असेल, शेतकऱ्याची लुबाडणूक करत असेल, तर आता हातामध्ये रुमन घेतलच पाहीजे. आणि यासाठी कारखान्यांवरती धडक मारून एकजुटीने रास्त भावाची मागणी केली पाहीजे. कमीत कमी उसाच्या टनाला चार ते पाच हजार रुपये भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि एफआरपी न देणाऱ्या साखर कारखानदारांना का हे सरकार बेड्या घालत नाही ? आवाज जरा उठवला पाहिजे दोस्तांनो…एकजुटीने या लढ्यात भागीदारी केली पाहीजे. एक डिसेंबरला सायखेडा कारखान्यावर धडक मारण्याकरता हजारोच्या संख्येने सहभागी व्हा. मगरुर साखर कारखानदारांची मस्ती जिरवण्याकरिता रस्त्यावरती आता उतरलचं पाहीजे. कुठे झोपलेला आहे तो साखर आयुक्त ? कुठे झोपले आहे ते सहकार मंत्रालय ? का शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही ? दोस्तानो, लढा आता थांबणार नाही. जोपर्यंत उसाला रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत माग हटायचं नाही हाच आता आपला पक्का निर्धार…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
