कोल्हापूर – दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) कोलकत्ता या शिखर संस्थेच्या कोल्हापूर स्थानिक केंद्राच्या अध्यक्षपदी इंजि. अजय देशपांडे आणि मानद सचिव पदी इंजि. योगेश चिमटे यांची निवड करण्यात आली.
इंजि. अजय देशपांडे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी कृषी अभियांत्रिकी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांनी सिंचन व निचरा अभियांत्रिकी, पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापन, कृषी यंत्रे व औजारे, हरितगृह तंत्रज्ञान ई. क्षेत्रामध्ये एकूण ३८ वर्षापासून अध्यापन, मार्गदर्शन केले आहे. तसेच इंजि. योगेश चिमटे हे कोल्हापुरातील नामांकित डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे या ठिकाणी संगणक अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विविध शोधनिबंध सादर केले आहेत.
संस्था संचालकपदी जयदीप बागी, बलराम महाजन, प्रदीप कुलकर्णी, मंजुषा सरनोबत, विजय भांबुरे, दादासो देसाई, श्रीकांत कदम, संजय सावंत, विनायक फास्के, बाळासाहेब पाटील, अर्जुन कोळी, सुनील पाटील, मनोज चव्हाण, संजय इंगळे आणि उदय पाटील यांची निवड करण्यात आली.
यासंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ( ता १० ) इंजि. आर. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे मानद सचिव इंजि. संजय खोत यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सभा खेळीमेळीत पार पडली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.