November 21, 2024
There are signs of cold weather in some districts in the coming week
Home » येत्या आठवड्याभरात काही जिल्ह्यात थंडीला सुरूवात होण्याचे संकेत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

येत्या आठवड्याभरात काही जिल्ह्यात थंडीला सुरूवात होण्याचे संकेत

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

‘ यंदाच्या थंडीच्या अवस्थेसंबंधी ‘

पावसाची सांगता ऑक्टोबरअखेर जाणवते. आणि अजुनही ‘ ला- निना ‘ दृष्टिपथात नाही. त्यामुळे लगेचच थंडीची चाहूल महाराष्ट्रात लागण्याची शक्यता जाणवते.
                 येत्या आठवड्याभरात नाशिक,  जालना, संभाजी नगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरूवात होण्याचे संकेत मिळू लागले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात मात्र ह्या आठवड्यात लगेच थंडी जाणवणार नाही.

एक नोव्हेंबर नंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीत वाढ होवु शकते. जोपर्यंत ‘ ला- निना ‘ अवतरत नाही तोपर्यंत ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये थंडीची ही स्थिती कायमच टिकून राहू शकते, असे वाटते. ‘ ला- निना ‘ च्या हजेरीनंतर होणाऱ्या वातावरणीय बदलानुसार थंडीचे चढ-उतार, त्या-त्या  वेळी नक्कीच स्पष्ट करता येईल.

सध्या  काही ठिकाणी होतं असलेला पाऊस शेतकामासाठी काहीसा अडचणींचा ठरत असला तरी आता हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा असुन रब्बीची हंगामाची शेतजमीन बैठक तयार करण्यास मदत करणारा आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading