वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार संहित्यकृतीना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२२ या कालखंडासाठी देण्यात येणारे गावगाडा साहित्य पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी जाहीर केले. या पुरस्काराचे हे १२ वे वर्ष आहे.
गावागाडा साहित्य पुरस्कार डॉ. कालिदास शिंदे ( मुंबई ) यांच्या झोळी या आत्मचरित्रास व बाबुराव इंगळे ( सोलापूर ) यांच्या ” बेनितुरेच्या काठावर ‘याआत्मचरित्रास विभागूण देण्यात आला आहे.
देविदास मरीप्पा पोळके स्मृति पुरस्कार धम्मसंगिनी रमागोरख ( नागपूर ) यांच्या ‘स्त्रीवादी आंबेडकरवाद ‘ या समीक्षा ग्रंथास व डॉ. सुनीता चव्हाण ( मुंबई ) यांच्या भयातून निर्भयाकडे या कथासंग्रहास देण्यात आला आहे.
रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृति पुरस्कार सौ. मेघा पाटील ( सांगली ) यांच्या “सुलवान ” या कादंबरीस देण्यात आला आहे. रत्नमाला बबन पिसाळ स्मृति पुरस्कार आबासाहेब पाटील (कर्नाटक) यांच्या घामाची ओल धरून या कवितासंग्रहास व राजेंद्र भाग्यवंत ( करमाळा ) यांच्या ‘मी गुरुजी झालो त्याची गोष्ट ‘ या आत्मचारित्रात्मक लेखास देण्यात आला आहे.
गावागाडा क्रीडा पुरस्कार ऋतुजा चंद्रकांत साळुंके ( सातोली) – थाळीफेकसाठी तर राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार (करमाळा ) हिला मल्लखांब / योगा यासाठी देण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, रोख रक्कम असे आहे. पार्थ पोळके, डॉ. जनार्धन भोसले, दत्तात्रय पिसाळ, प्रा. डॉ. संजय चौधरी, डॉ. मच्छिंद्र नांगरे, हरिभाऊ हिरडे, प्रज्ञा दिक्षीत, प्रा. संतोष साळुंके, लक्ष्मण जगदाळे, श्रीकृष्ण जगदाळे, हरिशचंद्र साळुंके यांनी साहित्य कलाकृती पुरस्कार निवडीचे काम पाहिले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.