December 12, 2025
“36th South Maharashtra Literary Conference at Gadhinglaj featuring poets, authors, seminars, interviews and cultural programs from December 12–14, 2025.”
Home » दमसाचे ३६ वे साहित्य संमेलन शुक्रवारपासून गडहिंग्लजला
काय चाललयं अवतीभवती

दमसाचे ३६ वे साहित्य संमेलन शुक्रवारपासून गडहिंग्लजला

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुल यांच्यावतीने ३६ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन शुक्रवारी ( दि. १२) शनिवारी ( दि.१३ ), आणि रविवारी ( दि. १४ ) होत आहे. शुक्रवारी ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होणार असून शनिवारी उद्घाटन समारंभ होईल.

या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे असून उद्घाटक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस आहेत. तर स्वागताध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे आहेत.

संमेलनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी आहे. शुक्रवारी ( दि. १२) सकाळी १०. ०० वा. ग्रंथदिंडीचे आयोजन केलेले आहे. शनिवारी ( दि. १३) डिसेंबर २०२५ सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अच्युत माने यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी योगिता माळी यांच्या स्मरणार्थ अनुबंध प्रतिष्ठान यांच्यातर्फे राज्यस्तरीय काव्य पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी दोन वाजता साहित्यिक आसाराम लोमटे यांची मुलाखत विजय चोरमारे व नामदेव माळी हे घेणार आहेत. तर दुपारी तीन वाजता कविसंमेलन होणार असून याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी आणि समीक्षक रफीक सूरज आहेत. यामध्ये किरण भावसार, सचिन शिंदे, विलास गावडे, धनाजी घोरपडे, धर्मवीर पाटील, संकेत म्हात्रे, सुभाष कोरे, गोपाळ गावडे, शिवाजी शिंदे, चंद्रशेखर कांबळे, अशोक अलगुंडी, नीलेश शेळके, महेश कराडकर, अभिजीत पाटील, रावसाहेब मुरगी, मधुकर जांभळे, उर्मिला शहा, संजय कांबळे, अनिल कलगुटकी, संभाजी जगताप, प्रणिता शिपुरकर, संजय थोरात, निर्मला शेवाळे यांचा सहभाग आहे. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार हे करणार आहेत. सायंकाळी ५. ३० वाजता कवितेचे जेव्हा गाणे होते : या कार्यक्रमाचे सादरीकरण जेष्ठ कवी अरुण म्हात्रे करणार आहेत.

रविवारी ( दि. १४ ) सकाळी १० वाजता आजच्या काळात लेखकांच्या पुढील आव्हाने ! या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत असून यामध्ये प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, संपत देसाई, राजा माळगी, बाळासाहेब पाटील यांचा सहभाग आहे.

सकाळी ११. ३० वाजता लेखक -विद्यार्थी संवाद होणार आहे. यामध्ये अध्यक्षस्थानी स्वाती शिंदे-पवार असून यामध्ये मनोहर भोसले, दयासागर बन्ने यांचा सहभाग आहे. दुपारी दोन वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून याचे अध्यक्षस्थानी संजीवनी तडेगावकर या आहेत. यामध्ये सुरेश शिंदे, हनुमंत चांदगुडे,भरत दौंडकर, आबा पाटील, रमजान मुल्ला यांचा सहभाग आहे. दुपारी चार वाजता कथाकथन होणार असून याचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार अप्पासाहेब खोत आहेत. यामध्ये हिंमत पाटील, जयवंत आवटे, सुभाष खोत यांचा सहभाग आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading