कोल्हापूर – येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “ॲड” या लघुपटाला Kodaikanal International Film Festival, Tamil Nadu मध्ये Best Debut Short Film Award मिळाला आहे. तसेच Purgatory Film Festival,Southampton, UK येथे Official Selection झाली आहे.
सरकारी योजनांची भिंती चित्राचे काम करणाऱ्या एका पेंटरच्या आयुष्यावर आधारित असणारा हा लघुपट व्यक्तिगत व सामाजिक विचारांवर भाष्य करतो आहे.
या लघुपटाची विजयालक्ष्मी फिल्म्स ने निर्मीती केली आहे. या लघुपटाची लेखिका व निर्माती स्नेहल जोतीबा कांबळे हिची तर दिग्दर्शक, डि.ओ.पी, एडिटिंग स्वप्निल बळवंत पाटील यांनी केले आहे. ओमकार सुतार यांचे संगीत दिग्दर्शन, वेशभूषा शाहिस्ता मकानदार, रंगभुषा रुपाली सूर्यवंशी, सहाय्यक दिग्दर्शक समीर भोरे यांनी काम पाहिले आहे. तर प्रमोद फडतरे, प्रणोती कुमठेकर, संचिता कुमठेकर, सुरेंद्र बोंगाळे या कलाकारांनी विविध भूमिका साकारली आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
