🐊मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे.🐊
गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी मगरींच्या विणीच्या आणि संगोपनाच्या हा कालावधीत त्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये.
– अजितकुमार पाटील
सांगली
मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम काळात मोठ्या मगरी ह्या आक्रमक असतात. आपल्या पिल्लांवर/प्रजातीवर धोका निर्माण होऊ नये म्हणून तिच्या अधिवासात येणाऱ्या प्रत्येकावर या मगरी हल्ला करतात. त्यामुळे प्राण्यांवर तसेच मानवावर जीवघेणे हल्ले मगरींकडून या कालावधीत होताना पाहायला मिळते. तरी सर्व नागरिकांना या कालावधीत नदी परिसरात काम करत असताना योग्य ती काळजी घ्यावी. नदी पात्रात खोल पाण्यात उतरणे, कपडे धुणे, पोहणे, पाण्यात उतरून अंघोळ करणे तसेच खोल पाण्यात / पाण्याजवळ जनावरे घेऊन जाणे टाळावे. नदी पत्राचा वापर काळजी घेऊन करावा.
नदी पत्रात मगरीचा वावर दिसत असेल तर पाण्यात जाणे टाळावे. जनावरांना पाणी पाजताना पाण्या काठी कमी उथळ जागेत घेऊन जावे. खोल पाण्यात उतरून कपडे धुणे टाळावे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांवर मागरीचे हल्ले झालेले आढळतात. त्यामुळे लहान मुलांना पाण्यात सोडू नये. विध्यार्थ्यांची परीक्षा संपत आल्या आहेत व उन्हाळी सुट्टी सुरू होत आहे, तरी पालकांनी मुलांना नदीवर पोहण्यास पाठवू नये जेणेकरून लहान मुलांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही.
जाणून घ्या मगरीचे आचरण
मगर ही पाण्यात वावरते व जमिनीवर राहते ; जमिनीवर माती उकरून अंडी घालते व घरट्याचे संगोपन करते. एक ते दीड महिन्यात घरट्यातील अंड्यातून मगरीची पिल्ले जन्मतात व अन्नासाठी पाण्यात उतरतात. मगर ही पिल्लांना शिकार करून अन्न भरवत नाही किंवा दूध पाजत नाही तर मगरीची लहान पिल्ले पाण्यात उतरून कीटक तसेच लहान मासे खाऊन मोठी होतात. मगरींना रोजचे खाद्य हे फार कमी प्रमाणात लागत असलेने ते इतर प्राण्यांप्रमाणे शिकार करून साठवून ठेवत नाहीत. म्हणूनच मगर ही मोठया प्राण्यांची शिकार करतांना आपल्या भागात आढळत नाही.
गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी मगरींच्या विणीच्या आणि संगोपनाच्या हा कालावधीत त्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल अशी कोणतीही कृती करू नये.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.