September 7, 2024
Call for submissions of childrens literature for awards By Sane Guruji Kathamala Solapur
Home » पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – येथील अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला जिल्हा समितीच्यावतीने पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अशोक खानापूरे यांनी दिली आहे.

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, जिल्हा समितीच्या वतीने सन-२०२४ या वर्षात प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार-२०२४ व निर्मला मठपती स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार-२०२४ देण्यात येणार आहे. प्रत्येकी २५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासाठी बालसाहित्य पाठवण्याचे आवाहन कथामालेतर्फे करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेले बालसाहित्य ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठविण्यात यावे. अधिक माहितीसाठी अशोक खानापूरे यांच्याशी संपर्क साधावा.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
अशोक भिमाशंकर खानापुरे,
अध्यक्ष, २१ बी, नंदीकेश नगर,
शेळगी, सोलापूर – ४१३००६ मोबाईल – ९४०३२९५००४


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

टिचभर पोटासाठी

मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे अरविंद गोखले, विद्याधर निमकर यांना पुरस्कार

मुळा लागवड तंत्र

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading