डॉ. आई तेंडुलकर या नावापासूनच सारे विलक्षण…बेळगावच्या तरूणाची दोन देशात घडेलली अद् भुत कथा…जाणून घेऊया या कथेबद्दल अनुवादक सुनीता लोहोकरे यांच्याकडून…
डॉ. आई तेंडुलकर या नावापासूनच सारे विलक्षण…बेळगाव जवळील एका छोट्या गावात जन्मलेला एक तरूण गणपत तेंडुलकर शिक्षणासाठी युरोपला जातो. तेथे तो डॉ आई तेंडुलकर या नावाने जर्मन वृत्तपत्रांत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे चित्रण करू लागतो. त्याच कालावधीत दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. हा युवक भारतात परतून मराठी वृत्तपत्र सुरु करतो. स्वातंत्र्य चळवळीत सहभागासाठी त्याला पाच वर्षांचा तुरूंगवास भोगतो. गांधीजींच्या आश्रमातील एका तडफदार तरुणीशी विवाह करतो. पुढे पोलाद उद्योग सुरु करतो. त्याचे सगळे आयुष्यच विलक्षण आणि जगावेगळे आहे..दोन देशात घडलेली ही अद् भुत कहाणी…जाणून घेऊया या कथेबद्दल अनुवादक सुनीता लोहोकरे यांच्याकडून…
पुस्तकाचे नाव – दोन देश तीन कथा डॉ. आई तेंडुलकर
मुळ लेखिका – लक्ष्मी तेंडुलकर धौल
अनुवाद – सुनीता लोहोकरे
प्रकाशक – राजहंस प्रकाशन