धुळधाण शेताने शेतकऱ्याला पैशानी दिले बँकाना संरक्षण दरवाजानेच चोराला वाट करून दिली… निकालात काढला पुरता व्यापाऱ्यांनी दर शेताने शेतकऱ्याला लागवडीखाली आणले… देणगीशिवाय प्रवेश अशा शाळा हेरून पोरांनी शिकवला गुरुजींना धडा … बातम्यांनी पत्रकारांना चलनात छापले शृंगारकथांनी केला संपादक उघडा… चौकातल्या गुंडांचे समाजकार्य बघून भरदिवसा भरली खंडणीला धडकी… प्रेताला नागवून पळाली भूक रिकाम्या पोटाने उचलली तडकी… गोविंद पाटील, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.