माधुरी तुझ्या एक्स्प्रेशन्सची दाद द्यायलाच हवी
कोणत्याही कलाकाराला प्रेक्षकांनी दिलेली दाद हाच खरा पुरस्कार असतो. लेखक अन् कलाकाराचे समाधान हे यातच असते. कलेतून खूप संपत्ती मिळेल पण ती संपत्ती समाधान देतेच असे नाही पण प्रेक्षकाने मनापासून केलेली स्तुती हेच खरे समाधानाचे धन असते.
माधुरी पवारला गणेश आचार्य यांच्या समोर नृत्य करण्याची संधी मिळाली. नृत्याच्या क्षेत्रातील गुरुवर्यांच्यासमोर जेंव्हा नृत्य करण्याची संधी मिळते तेंव्हा त्या कलाकाराची धाकधुक अधिकच वाढते. पण आमची माधुरी घाबरणारी थोडीच आहे अन् मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे ही तिच्याकडून निश्चितच शिकायला हवे. धाकधुक असूनही तिने केलेल्या नृत्यावर गणेश आचार्य प्रसन्न झाले.
याबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, “द गणेश आचार्य “ हे नाव कोणालाच अनोळखी नाही. नृत्य क्षेत्रातील दिग्गजाला कोण नाही ओळखणार… मी तर माझ्या लहानपणापासूनच जेव्हा पासून पाय थिरकायला लागले, तेव्हापासून त्यांना फॉलो करते. ….आणि आज त्यांच्यासमोर नृत्य करण्याची संधी गणरायाने दिली. उत्सुकता फक्त एवढीच होती की त्यांना माझा डान्स कसा वाटेल ?… गणेश सर जे बोलले, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही की खरंच त्यांना माझा डान्स बघितल्यावर तरुणपणीचे ‘गणेश आचार्य’आठवले….म्हणजे त्यांची छबी माझ्यात दिसली. धन्य तो परमेश्वर त्याने मला खूप काही दिलं. माझ्या नृत्याने माझी ओळख दिली आणि त्याची पोचपावती गणेश आचार्य सरांनी दिली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.