काय डोंगर काय ते झाडी
पळून जाणारे खाई हाडी,
मतदारांना नेसवे ती साडी
पक्षात चाले फोडाफोडी,
राव रंकाची जमते जोडी
एका बाटलीत लाडीगोडी
तु आण चकण्याची पुडी,
एकच ब्रॉड व्हिस्की रावडी,
मेजवानी रमली डोंगरखडी
एक हाड सर्वजन फोडी,
विभुषनाची मांदंळ खोडी
पिल्यावर होई राडा राडी,
रामनामाचे सांगे संगवडी
हनुमानाची भक्तीत गोडी,
सर्व हिताचे निर्णय झोडी
पाझळून दावी सत्वगडी,
जगास सांगे रत्न भाबडी
विचार नाही कवडी काडी,
खुर्ची बसला खेळ सोंगडी
उखडून टाका त्याची घोंगडी,
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.