📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

यशवंत मनोहर प्रतिष्ठानतर्फे हबीब भंडारे, विनायक पवार यांना पुरस्कार

Yashwant Manohar Pratishthan Nagpur award ceremony and book release event poster

नागपूर – येथील यशवंत मनोहर प्रतिष्ठानचे यंदाचे पुरस्कार प्रसिद्ध कवी, लेखक हबीब भंडारे ( छत्रपती संभाजीनगर ) यांच्या ‘मृत्यूच्या अनिश्चित सावटाखाली’ या कवितासंग्रहास तर प्रसिद्ध कवी, गीतकार विनायक पवार ( पेण, जिल्हा – रायगड ) यांच्या ‘नामुष्कीचे पिढीजात वर्तमान’ या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे आहे.

या अगोदर हे पुरस्कार दा. गो. काळे (शेगाव ), विवेक काटीकर ( पुणे ), भाग्यश्री केसकर ( धाराशिव ), प्रशांत वंजारे ( आर्णी ), अशोक पळवेकर (अमरावती ) यांना मिळाले आहेत. पुरस्कार वितरण आणि या प्रसंगी होणाऱ्या विविध पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकमत, नागपूरचे संपादक श्रीमंत माने हे राहणार आहेत. तर विशेष अतिथी दैनिक महाराष्ट्र टाइम्स, नागपूरचे संपादक श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळेस मान्यवरांच्या उपस्थितीत ‘चिंतनपौर्णिमा,’ ‘आसवांची वेल’, ‘बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन भारतीय संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांच्या हस्ते होणार आहेत.

पुरस्काराचे वितरण आणि पुस्तक प्रकाशन २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करुणा भवन, बजाजनगर, नागपूर येथे होणार आहे, अशी माहिती यशवंत मनोहर प्रतिष्ठान, नागपूर यांनी दिली आहे.

Related posts

रंगबहार संस्थेच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त रेखाटन स्पर्धा

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील

सातारा येथील डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
Skip to toolbar