कांदाच्या सालीपासून किंवा कांद्याच्या टाकावू कचऱ्यापासून खत कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊया स्मिता पाटील यांच्याकडून…
आपण रोजच्या जेवणात कांदा वापरतो. पण तो वापरताना त्याच्यावरील साली काढून टाकतो. यासालींचा कचरा खूप असतो. हा कचरा टाकून न देता तो एकत्र करावा. बाजारातून कांदा विकत आणल्यानंतरही त्यातून सालीचा कचरा खूप निघतो. हा सालीचा कचरा पाण्यात भिजत ठेवायचा आहे. एक दिवस पाण्यात भिजल्यानंतर या साली त्या पाण्यातून काढून घ्यायच्या आहेत. या पाण्यामध्ये आयर्न, कॅल्शिअम पोट्याशिअम, कॉपर आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या झाडांसाठी खूप आवश्यक असतात. हे पाणी झाडांना हे खत म्हणून उपयुक्त ठरते. एका झाडाला वाटीभर पाणी पुरेसे आहे. तसेच उरलेल्या साली सुद्धा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरता येतात. घरातीलच कचऱ्यापासून आपण घरच्या घरी खत तयार करून झाडांना व वेलांना घातल्यास किंवा फळभाज्यांना घातल्यास येणारे उत्पादन हे सेंद्रिय तर असणारच आहे त्याशिवाय किटकनाशक मुक्त असणार आहे.