गडचिरोली – नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजीत ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा- २०२४-२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धा राज्यस्तरीय असली तरी जगभरातून साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात परिक्षकांनी विविध प्रकारच्या ३३ साहित्यांची निवड केली आहे.
कादंबरी विभाग
१) पंजाबची वाघीण – (अर्चना देव, बुलढाणा), २) काडीमोडातील काटे – (भ.पुं.कालवे, संभाजीनगर)३) वारी – (डॉ. वसुधा वैद्य, नागपूर)
कथासंग्रह विभागात
१) मिरॅकल – (डॉ. सुनील विभुते, बार्शी) २) झुरळ आणि इतर काही बाही (प्रमोदकुमार अणेराव, भंडारा) ३) पठारावरचा दौलती -( प्रा. रसूल सोलापुरे,कोल्हापूर)
कवितासंग्रह विभागात
१) सिझर न झालेल्या कविता – (प्रा. डॉ. सुनील श्रीराम पवार, मेहकर), २) माडिया पिल्लो – (डॉ. यादवराव गावळे, बऱ्हाणपूर, म.प्र.) ३) रुजता हलकेच – (सौ. स्मिता जडे, दामाजीनगर)
गझलसंग्रह विभाग
१) दीवान- ए- सिराज – (सिराज करीम शिकलगार, पलूस,जि. सांगली) २) मी शब्दांना मशाल करतो – दिलीप सीताराम पाटील, राजूरा
समीक्षाग्रंथ
१) पंडित – काव्य- रसास्वाद (त्रिदल) – (रमेश पोफळी, पुणे) २) नामदेव ढसाळ यांची कविता: आस्वाद आणि चिकित्सा – (डॉ. विनोद राऊत, बोरगाव मेघे) ३) ‘बुढाई’ एक अभ्यास – डॉ. माधव कांडणगिरे, घुग्गुस (जि. चंद्रपूर)
संपादन/ संशोधन
१) वसुंधरेचे शोधयात्री – (डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर, बंगलोर) २) अंतराळवेध – (राजीव गजानन पुजारी, सांगली, ३) मराठी तेलुगू भाषिक अनुबंध – (डॉ. दत्ताराम राठोड, अमरावती)
नाटक
१) ना ते आपुले -(डॉ. विजयकुमार देशमुख, गोरेगाव (पू), २) परिवर्तन – (राजरत्न पेटकर, (वरोरा)
आत्मचरित्र
१) वन वे टिकीट टू यु.के.- (डॉ. राजश्री शिरभाते, इंग्लंड (यु.के.)’ २) जागरण – भारत सातपुते, (लातूर) ३) दौशाड – डॉ. नंदकुमार राऊत, (पनवेल)
चरित्रग्रंथ
१) कीर्तनसम्राट बाबामहाराज सातारकर – (सुनील पांडे,नीरा (पुणे) २) ज्ञानसूर्य म्हाइंभट- अनिल शेवाळकर, हिंगोली)
ललीतलेख
१) कोलाज – मुग्धा शेखर बोरकर (फोंडा – गोवा) २) वारी जनातली, जनांच्या मनातली – (डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, खारघर (नवी मुंबई)
वैचारिक लेखसंग्रह
१)चोरांची लोकशाही – अनिल शां. पाटील (अलिबाग, जि.रायगड २) स्वातंत्र्याची ७५ वर्षे- (सत्यवान मंडलिक, वाळवा (सांगली)
बाल / कुमार साहित्य
१) गोष्टींतून विज्ञान सुगंध – (डॉ. मानसी मंगेश कोलते, व डॉ. संजय जानराव ढोबळे, नागपूर), २) थेंबा थेंबाची कहाणी – (गणेश भाकरे, सावनेर)
आत्मकथन
१) पोलीस मन – (अजित देशमुख, सानपाडा, नवी मुंबई) २) क्षण.. सोनेरी, रुपेरी आणि काटेरी – (आनंद इंदिरा श्रीधर सांडू, चेंबूर, मुंबई) ३) स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया आणि ‘मी’ अर्थात मृत्युंजय – (सुनील देसाई, भुदरगड, जि. कोल्हापूर)
सात डिसेंबरला गडचिरोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात होणाऱ्या साहित्य सोहळ्यात या साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
