चंद्रपूर – कोरपना येथील गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट मराठी गझलसंग्रहास पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ११,१११ रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे आहे.
पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहाची निवड करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याची अंतिम तारीख ७ जानेवारी २०२४ असून गझल संग्रहाच्या तीन प्रती व गझलकार परिचय पाठविण्यात यावा. असे आवाहन जयवंत वानखडे यांनी केले आहे. गझलसंग्रहाचे परीक्षण महाराष्ट्रातील दोन मान्यवर जेष्ठ गझलकारांकडून तसेच द्रोणाचार्य सार्वजनिक वाचनालय कोरपनाच्या भाषा समिती सदस्यांकडून करण्यात येणार आहे. यातूनच योग्य संग्रहाची निवड करण्यात येईल, असेही वानखेडे यांनी सांगितले.
गझलसंग्रह पाठविण्याचा पत्ता असा – जयवंत वानखडे , (माजी प्राचार्य ), सचिव, गझल मंथन साहित्य संस्था, मु.बुरान ले आऊट, वार्ड नंबर १, टीचर कॉलनी,कोरपना, ता. कोरपना, जि. चंद्रपूर पिनकोड ४४२९१६. अधिक माहितीसाठी संपर्क – भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.