सांगली – कामेश्वरी साहित्य मंडळ व कामेरी ( ता.वाळवा, जि. सांगली ) येथील स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे २०२४ चे राज्यस्तरीय मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य पुरस्कारासाठी निवेदन पाठवून महाराष्ट्रातून विविध वाड्मय प्रकारातील पुस्तके मागवली जातात. परंतु यावर्षी कोणत्याही वाड्मय प्रकारातील पुस्तके न मागवता पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.
पुरस्कार निवडीसाठी वाड्मयीन तज्ज्ञ तीन सदस्यीय समिती परीक्षक म्हणून नेमली होती. साहित्य पुरस्कार लवकरच मातृ स्मृती ग्रामीण साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी दिली आहे.
पुरस्कारविजेते व साहित्यकृती अशा –
१) कादंबरी- गावखोरी – अशोक पवार, चंद्रपूर
२) कथासंग्रह- मौनाचं कुलूप – डॉ राजेंद्र माने, सातारा
३) कवितासंग्रह – घामाचे संदर्भ – किरण भावसार, नाशिक
४) ललित गद्य – माती आणि माणसं – प्रा. डॉ. विनय बापट, गोवा
५) चरित्र- ब्रह्मांडनायक, प्रा. संध्या देशपांडे, बेळगांव
६) बालसाहित्य – मातीला पंख फुटताना – डॉ. स्मिता पाटील, मोहोळ
(कथाकार रावजी संताजी शिंदे स्मृती साहित्य पुरस्कार)
७) संकीर्ण – ललकारी – शाहीर शाहिद खेरटकर, चिपळूण
(शीघ्र कवी तमाशा सम्राट नायकू जाधव स्मृती साहित्य पुरस्कार)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.