संजय कुनघाडकर, वंदना सोरते, कृष्णा कुंभारे विजयी
गडचिरोली : येथील स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानुसार दर महिन्याला ही स्पर्धा विनाशुल्क घेण्यात येते. या उपक्रमांतर्गत कवींना दिलेल्या विषयांवर कविता सादर करायची असून या कवितांमधून तीन उत्कृष्ट कवितांची निवड करण्यात येते. या कवितांना मासिक उत्कृष्ट कविता व कवीला उत्कृष्ट कवी म्हणून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने पुरस्कृत करण्यात येते. कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासणे हा स्पर्धेमागचा उद्देश असल्याने पुरस्कृत कवींना पुरस्कार म्हणून पुस्तके व आकर्षक प्रमाणपत्राने नाट्यश्री वार्षिक महोत्सवात मान्यवरांचे गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पहिले सत्र नुकतेच पार पडले असून या सत्राकरीता देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या घटना ‘पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर व अहमदाबाद विमान दुर्घटना’, असे तीन विषय देण्यात आले होते. यात ३८ कवींनी सहभाग नोंदवून दिलेल्या तीन विषयांवर एकूण ७१ कविता सादर केल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून चामोर्शी येथील संजय कुनघाडकर यांच्या ‘पहलगाम हल्ला’ या विषयावरील ‘रक्ताने माखली पहलगामची धरती’ या कवितेस प्रथम, गडचिरोली येथील कवयित्री वंदना सोरते यांच्या ‘अहमदाबाद विमान दुर्घटना’ या विषयावरील ‘धगधगत्या ज्वाळा’ या कवितेस द्वितीय व अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील कवी कृष्णा कुंभारे यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावरील ‘दगाबाज’ या कवितेस तृतीय क्रमांकाचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. जनबंधू मेश्राम, प्रसिद्ध कथाकार प्रमोद बोरसरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी केले आहे.
कवींच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.अरुण बुरे, दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. कृष्णा कुंभारे, सुनील उमाजी शेरकी, अशोक कांबळे, अहिंसक दहिवले, उकंडराव नारायण राऊत, नथ्थुजी चिमुरकर, पी. डी. काटकर, खेमदेव हस्ते, सुभाष धाराशिवकर, यामिनी मडावी, सुनील बावणे, वंदना मडावी, राजेंद्र सोनटक्के, सुरेश गेडाम, वसंत चापले, राजेश बारसागडे, वंदना सोरते, गणेश राजुरवार, धनश्री मुसने, शैला चिमड्यालवार, मंगला कारेकर, राजरत्न पेटकर, आत्माराम विठ्ठल बरडे, विलास जेंगठे, सपना कन्नाके, रंजना चुधरी, संजय कुनघाडकर, पुरुषोत्तम दहिकर, रेश्मा बावणे, मधुकर दुफारे, पुजा देवगीर गिरी, ज्योत्स्ना बन्सोड, सोनाली रायपुरे, सुरेखा बोरकर, प्रिती ईश्वर चहांदे, सुजाता अवचट, मिलिंद खोब्रागडे, प्रा. सरीता बुटले इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
