सोलापूर – साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव करण्याच्या हेतूने निर्मला मठपती फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सर्वोत्तम साहित्य निर्मिती पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या रविवारी, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता सोलापूरमधील शिवस्मारक, शिंदे चौक येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगवाळकर या भूषवणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. स्मिता पाटील, वंदना कुलकर्णी उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवांजली स्वामी, व सचिव उत्तरश्वर मठपती असणार आहेत.
🏆 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार विजेते जाहीर
फाऊंडेशनतर्फे कथा, कविता आणि बालवाङ्मय या तीन विभागांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड
कथा विभाग (प्रौढ वाङ्मय):
🥇 प्रथम पुरस्कार: ‘बयनामा’ – बा.बा. कोटंबे, परभणी
🥈 द्वितीय पुरस्कार: ‘बाभुळ फुलं’ – प्रतिभा खैरनार, नांदगाव, जि. नाशिक
🌟 विशेष उल्लेखनीय पुरस्कार: ‘आहे कसा तो आननी’ – डॉ. गीता जोशी, सोलापूर
कविता विभाग (प्रौढ वाङ्मय):
🥇 प्रथम पुरस्कार: ‘सीसीटिव्हींच्या गर्द छायेत’ – गीतेश गजानन शिंदे, ठाणे
🥈 द्वितीय पुरस्कार: ‘दिवस कातर होत जाताना…’ – धर्मराज पाटील, इस्लामपूर
🌟 विशेष उल्लेखनीय पुरस्कार: ‘अजान आणि चालिसा’ – मुबारक शेख, सोलापूर
बालवाङ्मय विभाग:
🥇 प्रथम पुरस्कार: ‘आगळ्या वेगळ्या गोष्टी’ – बबन शिंदे, कळमनुरी, जि. हिंगोली
🥈 द्वितीय पुरस्कार: ‘फुलांची शाळा’ – प्रा. अलका सपकाळ, पाथरुड, जि. धाराशिव
🌟 विशेष उल्लेखनीय पुरस्कार: ‘माणुसकी’ – अशोक खानापुरे, सोलापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
