आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
- ‘ गुरुवार(२४) पासून पावसाची उघडीप! ‘ ‘आज व उद्या मुंबईत पाऊस ‘
- ‘ २६ ते २९ दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता ‘
- ‘ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही.’
गुरुवार ( दि.२४ ऑक्टोबर) पासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप मिळू शकते, असे वाटते. परंतु शनिवार (दि. २६ ) ते मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) पर्यंतच्या चार दिवसात दक्षिण महाराष्ट्रात, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अश्या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईत मात्र आज व उद्या (दि. २१ व २२ ला ) जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. एक नोव्हेंबर नंतर पावसाची पूर्णतः उघडीप मिळू शकते, असे वाटते.
थायलंडच्या पश्चिम किनारपट्टीसमोर व अंदमान बेटांच्या उत्तरेला, बंगालच्या उपसागरात आज तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचे, उद्या (दि. २२ ला) तीव्र कमी दाब क्षेत्रात तर परवा (दि. २३ ला) चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता जाणवते. गुरुवारी (दि.२४ ऑक्टोबरला) ओरिसा व पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ह्या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.