भक्तीभावे होऊन दंग गाईन मी अभंग ।
तुझ्या दारी पायी चालत येईन मी श्रीरंग ।। धृ ।।
पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।
श्रीहरि विठ्ठल । जय हरी विठ्ठल ॥
टाळ चिपळ्यांची साथ हाती घेऊन मृदंग ।
वाजवीन दिनरात गाती वारकरी संग ।
एक ताल एक सूर भक्तीमय सत्संग ।
म्हणूनी पायी चालत येईन मी श्रीरंग ।
पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।
श्रीहरि विठ्ठल । जय हरी विठ्ठल ॥१॥
संत सज्जनांची सेवा मिळे ज्ञानाचा मेवा ।
मुखी हरिनाम सदा वसे भक्तीचाच ठेवा ।
तुझ्या पंढरीत मज जडतो हा व्यासंग ।
म्हणूनी पायी चालत येईन मी श्रीरंग ।
पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।
श्रीहरि विठ्ठल । जय हरी विठ्ठल ॥२॥
गळा तुळशी माळा भाळी बुक्का टिळा ।
संगे भक्तांचा मेळा रिंगणाचा सोहळा ।
वारकऱ्यांचा सत्संग पाहूनी मी होतो दंग ।
म्हणूनी पायी चालत येईन मी श्रीरंग ।
पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।
श्रीहरि विठ्ठल । जय हरी विठ्ठल ॥३॥
चंद्रशेखर प्रभाकर कासार, चांदवडकर, धुळे.
7588318543.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.